सांगली: नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा येथील आनंद गवळी आणि त्यांच्या पत्नी हे दोघेजण जत तालुक्यातल्या अमृतवाडी येथील बागायतदार शेतकरी दीपक हत्ती यांच्याकडे कामाला होते. चार दिवसांपूर्वी आनंद गवळी यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी आनंद गवळी यांनी पत्नीला जत या ठिकाणी उपचारासाठी नेले होते. यावेळी त्यांची असणारी चार मुले घरात होती. सायंकाळी परत आल्यानंतर त्यांची दोन मुले झोपलेली आढळून आली. तर सुलोचना आणि इंद्रजित ही मुले गायब असल्याचे निदर्शनास आले. यानंतर दोन्ही भावंडांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.
विहिरीत आढळले मुलांचे मृतदेह :गावात आणि जत पोलीस पोलिसांच्याकडून देखील या मुलांचा शोध घेण्यात येत होता. तर मुले सापडत नसल्याने अपहरणाची तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. यानंतर घराजवळ असणाऱ्या एका विहिरीमध्ये ही मुले पडल्याचा संशय आल्याने, त्या ठिकाणी देखील शोध मोहीम राबवण्यात आली होती. मात्र त्या विहिरीत मुले आढळून आली नव्हती. सर्वत्र शोध मोहीम राबवून देखील मुले सापडत नसल्याने नेमके या मुलांचे काय झाले असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र अखेर आज दुपारी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या विहिरीमध्ये दुपारी या दोन्ही मुलांचे मृतदेह तरंगताना आढळून आली. याबाबत अधिक तपास केला जात आहे.
मुलगी सेप्टिक टॅंकमध्ये पडली: नागपुरात सेप्टिक टॅंकमध्ये बुडून 5 वर्षीय मूक मुलीचा मृत्यू झाल्याची घटना अलीकडेच घडली आहे. ही मुलगी 10 फेब्रुवारी, 2023 रोजी उघड्या पाण्याच्या टाकीत पडली होती. बेलतरोडी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी ज्योतीचा मृतदेह उत्तरीय तपासणी करता पाठवून चौकशीला सुरुवात केली. ज्योती राजू साहू असे मृत मुलीचे नाव आहे. ती 9 तारखेपासून बेपत्ता होती. काल दुपारी ती खेळायला गेली होती. खेळखेळता ती टाकीत पडली असावी. परंतु ज्योतीला बोलता येत नसल्याने ज्योती ओरडू शकली नाही. त्यामुळे तिचा बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधला जात आहे.