सांगली - मान्सून दरम्यान संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन आता पासून महापालिका प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आजपासून कृष्णा नदी पात्रात बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. यावेळी बोट प्रात्यक्षिके देखील पार पडली.
भय पुराचे...कृष्णानदी काठी बोटी तैनात; आयुक्तांसमोर प्रात्यक्षिकांचे सादरीकरण - boats in krishna river
मान्सून दरम्यान संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन आता पासून महापालिका प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आजपासून कृष्णा नदी पात्रात बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. यावेळी बोट प्रात्यक्षिके देखील पार पडली.
पुराच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदी पात्रात बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.
तर पुराचा धोका आणि दोन दिवसांत कृष्णेची वाढलेली पाणी पातळी लक्षात घेऊन पालिकेने आज पासून नदीकाठावर बोटी तैनात केल्या आहेत. आज पार पडलेल्या प्रात्यक्षिकांवेळी उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे,आदी उपस्थित होते.
गतवर्षी आलेल्या महापुराची धास्ती अजूनही सांगलीकरांच्या मनात कायम आहे. पुन्हा पुराचा धोका निर्माण झाल्यास नुकसान टाळण्यासाठी नदीकाठच्या लोकांनी स्थलांतर कऱण्याच्या सुचना पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.