महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाविरोधात भाजपचे आंदोलन - सांगलीत भाजपचे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात औरंगाबाद या ठिकाणी एका तरुणीवर नोकरी लावण्याच्या आमिषाने बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याविरोधात सांगलीत भाजपने आंदोलन करून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

BJP's agitation against NCP's youth state president
युवक प्रदेशाध्यक्षाविरोधात भाजपचे आंदोलन

By

Published : Dec 30, 2020, 4:38 PM IST

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्ष यांच्यावर महिला अत्याचार प्रकरणी कारवाई करावी, या मागणीसाठी सांगलीमध्ये आज भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांचा निषेध नोंदवत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाविरोधात भाजपचे आंदोलन
निदर्शने आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी..राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात औरंगाबाद या ठिकाणी एका तरुणीवर नोकरी लावण्याच्या आमिषाने बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.शहरातील स्टेशन चौक या ठिकाणी जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शेख यांचा निषेध नोंदवला आहे.यावेळी महाविकास आघाडी सरकार व मेहबूब शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेख यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.त्याचबरोबर या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details