महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी; गीता सुतार सांगलीच्या नव्या महापौर - सांगली महापालिका महापौर गिता सुतार

सांगली महापालिकेच्या सभागृहामध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. सत्ताधारी भाजपविरुद्ध काँग्रेस आघाडी अशी निवडणूक पार पडली. यामध्ये महिला राखीव असणाऱ्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपच्या गीता सुतार आणि काँग्रेस आघाडीच्या नगरसेविका वर्षा निंबाळकर यांच्यात लढत झाली. यामध्ये ४३ विरुद्ध ३५ अशा मतांनी गीता सुतार यांनी ८ मतांच्या फरकांनी विजय मिळवला.

sangli municipality mayor election
महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी

By

Published : Feb 8, 2020, 11:32 AM IST

सांगली -महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. गीता सुतार यांची महापौर, तर आनंदा देवमाने यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये काँग्रेस आघाडीचा पराभव करत भाजपने विजय मिळवला आहे.

महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी; गीता सुतार सांगलीच्या नव्या महापौर

सांगली महापालिकेच्या सभागृहामध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. सत्ताधारी भाजपविरुद्ध काँग्रेस आघाडी अशी निवडणूक पार पडली. यामध्ये महिला राखीव असणाऱ्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपच्या गीता सुतार आणि काँग्रेस आघाडीच्या नगरसेविका वर्षा निंबाळकर यांच्यात लढत झाली. यामध्ये ४३ विरुद्ध ३५ अशा मतांनी गीता सुतार यांनी ८ मतांच्या फरकांनी विजय मिळवला, तर उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपचे मिरजेचे नगरसेवक आनंदा देवमाने आणि काँग्रेस आघाडीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यात लढत झाली. यामध्ये देवमाने यांनी ८ मतांनी आघाडीचे उमेदवार थोरात यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर भाजपच्या महापौर आणि उपमहापौर समर्थकांनी महापालिका परिसरात फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला आहे.

महापौरपदी निवड झाल्यानंतर नूतन महापौर गीता सुतार यांनी पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी आपला प्रयत्न राहील, असा विश्वास महापौर सुतार यांनी यावेळी व्यक्त केला आहे. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिकेत सत्ता असून महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत गाडगीळ यांनी सत्ता कायम राखत पुन्हा बाजी मारली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details