सांगली - एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणारे भारतीय जनता पार्टी नसून ठोशाला ठोसा देणारी पार्टी आहे, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तसेच राजू शेट्टी हा वारा आहे. तो कोणालाही सापडत नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी त्यांंची स्तुती केली आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील 'आमच्या तोंडावर जाऊ नका'
सांगलीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हा भाजपाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत यांनी दुसऱ्या पक्ष्यातून येणारी माणसं टीका करतात, या विधानावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत तुमच्याकडे सामना सारखे वर्तमान पत्र आहे. शिवसेना जॉईन झाल्यापासून सगळ्या बातम्यांचा रिसर्च करा. त्यात रोज सकाळी मोदींना आणि अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना शिव्या दिले आहेत आणि राणे साहेब तुमच्या धाटणीमध्ये होते. तुम्ही उगाचच आमच्यामध्ये भिंत पाडू नाका. आम्ही हुशार राजकारणी आहोत. आमच्या तोंडावर जाऊ नका, असा सूचक इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
'आता आम्ही सुद्धा ढोशास-ठोसा देतो'
भाजपाच्या अनेक नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यमुळे भाजप पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागत नाही का? यावरून बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, असे काही नाही. याउलट एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करणारी पार्टी नाही. आता आम्ही सुद्धा ढोशास-ठोसा देतो. अशाचप्रकारे यांना फरक पडतो. तसेच त्या-त्या भागातले नेते तेथील सवयीप्रमाणे बोलतात. पण असा कोणीही समज करून घेऊ नये, की भाजपा एका गालावर मारले, तर दुसरा गाल पुढे करते, अशा शब्दात चंद्रकांत पाटील विरोधकांना इशारा दिला आहे.
'राजू शेट्टी तर वारा'
माजी खासदार राजू शेट्टीकडून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपासोबत काढण्यात येणाऱ्या मोर्चावरून बोलताना, चंद्रकांत पाटील म्हणाले राजू शेट्टी हा एक वारा आहे. तो कोणाच्याही हातात सापडू शकत नाही. आमच्या बरोबर होते. त्यावेळीही ते चुकीचे असेल तिथे बोलत होते, अशा शब्दात राजू शेट्टींची स्तुती केली आहे.
'घाबरून आशिर्वाद यात्रा चिरडण्याचा प्रयत्न'
भाजपाच्या जन आशिर्वाद यात्रा चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. कायदा सुव्यवस्थाची काळजी घ्यायची असेल, तर त्यांच्या कार्यकर्त्यांना माघारी घेतले पाहिजे, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -पोलीस आणि गावगुंडांच्या जोरावर हे सरकार चालतंय - चंद्रकांत पाटील