महाराष्ट्र

maharashtra

सूडबुद्धीने फडणवीसांची सुरक्षा काढणाऱ्या मुख्यमंत्र्यांना घरात कशाला हवी सुरक्षा?

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना 'झेड प्लस' दर्जाची सुरक्षा आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने फडणवीस यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावरून भाजप आमदार व प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

By

Published : Jan 10, 2021, 4:49 PM IST

Published : Jan 10, 2021, 4:49 PM IST

सांगली
सांगली

सांगली- माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा कमी करण्याच्या मुद्द्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सूडबुद्धीने आणि कपटनीतीने फडणवीस यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. घरात बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कशासाठी सुरक्षा हवी आहे? असा टोलाही पडळकर यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.

सांगली

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना 'झेड प्लस' दर्जाची सुरक्षा आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने फडणवीस यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावरून भाजप आमदार व प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आकस बुद्धीने घेतलेला निर्णय..

आमदार पडळकर म्हणाले, मागच्या सरकारमध्ये असताना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवाद्यांच्या बाबतीत अनेक निर्णय घेतले होते. त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर विभागाच्या अहवालावरून देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवली होती. त्यानंतर विरोधी पक्षात आल्यानंतरसुद्धा पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरक्षा कवच पाहिजे, परंतु महाविकास आघाडी सरकारने आकसबुध्दीने आणि कपटनितीन त्यांच्या सोबत असणारे सुरक्षा रक्षक, बुलेट प्रूफ गाडी असे कवच कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आशीर्वाद हेच फडणवीसांचे कवच...

मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरक्षेची गरज नाही. कारण त्यांचे काम सर्वसामान्य आणि बारा बलुतेदारांच्या हितासाठी राहिले आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. त्या आशीर्वादाचे कवच त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा कवच गरजेचे नाही. आम्ही लाखो कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहोत.

मातोश्रीवरील गर्दी कमी झाली..

देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता महाविकास आघाडी सरकारला खुपत नाही, पोटात दुखत आहे. राज्यातील प्रत्येक संकटात देवेंद्र फडणवीस हे जनतेपर्यंत पोहचत, त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडले. त्यामुळे लोकांची गर्दी मातोश्रीऐवजी भाजपच्या भोवती वाढली आहे. त्यामुळे आकस बुद्धीने सरकारने हा निर्णय घेतला आहे, असा आरोप पडळकर यांनी केला आहे.

घरात बसणारे मुख्यमंत्री

तसेच मुळात राज्याचे मुख्यमंत्री घरात बसून आहेत, घराबाहेर पडत नाहीl. त्यामुळे घरात बसून असताना तुम्हाला सुरक्षेची गरज काय? शिवाय घरात असणाऱ्या कुटुंबाच्या सदस्यांना सुरक्षेची गरज काय आहे? तुम्ही संकटात लोकांच्यापर्यंत जात नाही, कसलेही संकट आल्यास घराबाहेर पडत नाही. त्यामुळे तुम्ही होऊन सुरक्षा नाकारायला पाहिजे, तसेच जे लोकांच्यामध्ये जातात, त्यांची सुरक्षा काढत आहात. तुम्ही घरात बसून आहात, उलट ज्या लोकांच्यापासून तुम्हाला धोका होता, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात, त्यामुळे कसलाही धोका नाही, असा टोला आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details