महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकारचा "डीएनए" भ्रष्टाचाराचा - पडळकर - bjp mla gopichand padalkar sangli

भाजपाचे विधान परिषददेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केला आहे. महाविकास आघाडी सरकारचा 'डीएनए' भ्रष्टाचाराचा आहे, असे ते म्हणाले.

mla gopichand padalkar
आमदार गोपीचंद पडळकर

By

Published : Oct 17, 2020, 9:49 PM IST

सांगली - राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचा "डीएनए" भ्रष्टाचाराचा आहे, असा आरोप भाजपाचे प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरून राज्य सरकारवर पडळकर यांनी निशाणा साधला. तसेच स्वतःचे अपयश झाकण्यासाठी हा उद्योग आहे. सरकारने चौकशीऐवजी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आधी मदत करावी, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. ते झरे येथे बोलत होते.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर महाविकास आघाडीवर टीका करताना.

भाजपा सरकारच्या काळामध्ये राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत जलयुक्त शिवार योजनेची चौकशी लावण्यात आली आहे. दरम्यान, या चौकशीवरुन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जलयुक्त शिवार योजना राबवली आहे. ती राज्यामध्ये यशस्वी झालेली आहे. तसेच त्याचे परिणाम सर्वदूर पाहायला मिळत आहेत. मात्र, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा एक उद्योग आहे. तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा "डीएनए" भ्रष्टाचाराचा आहे, अशी टीका पडळकर यांनी केली.

या सरकारच्या अनेक खात्यामध्ये भ्रष्टाचार झालेले आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची चौकशी लावण्यात आली आहे. मात्र, यातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने चौकशीऐवजी राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना अधिक मदत कशी देत येईल? हे पाहावे, अशी मागणीही पडळकर यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details