महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

District Central Bank Fraud : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गैरकारभाराबाबत भाजपाच्या आजी-आजी आमदारांची चौकशीची मागणी - भाजपाच्या आमदारांची चौकशीची मागणी

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गैरकारभाराबाबत (District Central Bank Fraud) चौकशीची भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजपा जिल्हाध्यक्षांनी मागणी केली (inquiry into district central bank fraud Sangali) आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

inquiry into district central bank fraud Sangali
बँकेच्या गैर कारभाराबाबत भाजपाच्य आमदारांची चौकशीची मागणी

By

Published : Nov 3, 2022, 1:24 PM IST

सांगली : जिल्हा मध्यवर्तीबँकेच्या गैरकारभाराबाबत (District Central Bank Fraud) चौकशीची भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजपा जिल्हाध्यक्षांनी मागणी केली (inquiry into district central bank fraud Sangali) आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेसची एकत्रित सत्ता आहे.


भ्रष्टाचाराचा आरोप :सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तत्कालीन बँकेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते दिलीप पाटील यांच्या कारकीर्दमध्ये नोकर भरती आणि इतर व्यवहार गोष्टीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. यानंतर सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीबाबत आदेश देण्यात आले होते. त्यासाठी समिती देखील नेमण्यात आली होती. मात्र 14 नोव्हेंबर 2021 रोजी तत्कालीन सहकार मंत्र्यांकडून चौकशीला स्थगिती देण्यात आली (district central bank fraud Sangali) होती.

बॅंकेवर एकत्रित सत्ता :सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपा यांची मिळून एकत्रित सत्ता आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपाचे खासदार संजयकाका पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचा सुरू कारभार आहे.

नव्याने चौकशीची मागणी :दरम्यान तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारमधील सहकार मंत्र्यांकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीला देण्यात आलेल्या स्थगितीबाबत आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख (BJP district president demanded) यांनी स्थगिती रद्द करून पुन्हा नव्याने चौकशी करण्याची मागणी भाजपाच्या सहकार मंत्र्यांकडे केली आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. तर भाजपा आमदार आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्याकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुन्हा चौकशीच्या करण्यात आलेल्या मागणीबाबत सहकार मंत्री काय ? भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details