सांगली:लवकरचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयासह राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील NCP state president Jayant Patil यांच्या घरावर देखील भाजपाचा झेंडा फडकेल. इतकचं नव्हे तर बारामतीमध्येही भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यालयात भाजपा कार्यलय सुरू असल्याचे, खळबळजनक विधान भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर BJP MLA Gopichand Padalkar यांनी केले आहे. ते सांगलीच्या उटगी या ठिकाणी आयोजित सभेमध्ये बोलत होते.
राष्ट्रवादी कार्यालयासह प्रदेशाध्यक्ष यांच्या घरावर भाजपचा झेंडा फडकेल - गोपीचंद पडळकर - भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar criticism: लवकरचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयासह राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील NCP state president Jayant Patil यांच्या घरावर देखील भाजपाचा झेंडा फडकेल. इतकचं नव्हे तर बारामतीमध्येही भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यालयात भाजपा कार्यलय सुरू असल्याचे, खळबळजनक विधान भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर BJP MLA Gopichand Padalkar यांनी केले आहे.

जत तालुक्यातल्या उदगी या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली आहे. या सभेमध्ये बोलताना गोपीचंद पडळकर, यांनी आगामी काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल. त्यानंतर बारामती, मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्यावर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकले, असे खळबळजनक वक्तव्य भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. तसेच काही दिवसांनी राष्ट्रवादी विसर्जित करून 90% लोक भाजपमध्ये येतील, असे वक्तव्य भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.