महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sangli Crime : धक्कादायक! सांगलीतील जतमध्ये भरदिवसा भाजप नगरसेवकाची हत्या - Sangli Crime

सांगली जिल्ह्यातील जतमध्ये भाजप नगरसेवक विजय ताड यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. भाजप नगरसेवकाच्या हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Sangli Crime
विजय ताड

By

Published : Mar 17, 2023, 5:33 PM IST

Updated : Mar 17, 2023, 5:55 PM IST

जतमध्ये भरदिवसा भाजप नगरसेवकाची हत्या

सांगली : जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीतील जतमध्ये भाजपा नगरसेवकाची हत्या करण्यात आली असून विजय ताड असे या भाजपा नगरसेवकाचे नाव आहे. मुलांना घरी आणायला जात असताना ताड यांची ईनोवा गाडी अडवून अज्ञातांनी गाडीवर हल्ला चढवला. त्यानंतर ताड यांची हत्या करण्यात आली. जतमधील सांगोला रोडवरील अल्फोंसो स्कूल जवळ भरदिवसा हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

भाजप नगरसेवकाची हत्या : जत नगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक विजय ताड यांची अज्ञातांनी हत्या केली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास विजय ताड हे आपल्या घरातून आपल्या ईनोवा गाडीतून बाहेर पडले. अल्फोंसा स्कूल या ठिकाणी त्यांची मुले शिकत आहेत. या मुलांना घरी आणण्यासाठी ताड हे निघाले होते. स्वतः ईनोवा गाडी चालवत तर हे जत शहरातल्या सांगोला रोडवरील असणाऱ्या अल्फोंसो स्कूल जवळ पोहोचले असता त्यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी ताड यांची ईनोवा गाडी अडवली आणि इनोवा गाडीची तोडफोड केली. विजय ताड हे गाडीतून बाहेर आले असता हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली. दरम्यान, विजय ताड हे जागीच ठार झाले.

हत्येचे कारण अस्पष्ट :भाजप नगरसेवकावर झालेल्या हल्ल्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच ताड समर्थकांनी या ठिकाणी मोठे गर्दी केली आहे. तर घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील जतकडे रवाना झाले.

राजकीय वैमनस्यातून हत्या :विजय ताड हे भाजपचे जत नगरपालिकेचे नगरसेवक आणि गटनेते देखील होते. ताड यांचा शेळीपालन आणि दूध डेअरीचा व्यवसाय होता. त्याचबरोबर जमिनी खरेदी-विक्रीचा देखील ताड यांचा व्यवसाय होता. तर या घटनेमुळे ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली आहे. याबाबत आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आर्थिक देवाण-घेवाण पासून राजकीय पूर्व वैमन्यातून ही हत्या झाली असावी, अशी चर्चा जत शहरामध्ये आता रंगली आहे. या घटनेमुळे जत शहरामध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाला असून जत पोलिसांनी तातडीने या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस फसवणूक प्रकरण; अनिक्षा जयसिंगानीला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Last Updated : Mar 17, 2023, 5:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details