महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तेजस्वी सूर्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सांगलीत भाजपा युवा मोर्चाकडून निषेध - तेजस्वी सुर्या बातम्या

पश्चिम बंगालमध्ये भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजीस्वी सूर्या यांची रॅली सुरू असताना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी रॅलीवर हा भ्याड हल्ला केला आहे, असा आरोप करत या हल्ल्याचा निषेधार्थ निदर्शने करण्यात आले.

bjp-condem-attack-on-tejaswi-surya-in-sangli
तेजस्वी सुर्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सांगलीत भाजपा युवा मोर्चाकडून निषेध

By

Published : Oct 9, 2020, 6:12 PM IST

सांगली - राष्ट्रीय भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सांगलीमध्ये भाजपाकडून आंदोलन करण्यात आले आहे. पश्चिम बंगाल सरकारच्याविरोधात निदर्शने करत तेजस्वी सूर्या यांना झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

तेजस्वी सुर्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ भाजपा युवा मोर्चाकडून निदर्शने

स्टेशन चौकात भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजीस्वी सूर्या यांची रॅली सुरू असताना टीएमसीच्या गुंडांनी रॅलीवर हा भ्याड हल्ला केला आहे, असा आरोप करत या हल्ल्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी पश्चिम बंगाल सरकार व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आला. तसेच हा हल्ला करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details