महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या संजयकाका पाटलांची पुन्हा बाजी, दुसऱ्यांदा झाले खासदार

सांगली लोकसभा मतदार संघातील अत्यंत चुरशीने पार पडलेल्या तिरंगी लढतीत भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी पुन्हा एकदा बाजी मारत निर्विवाद विजय मिळवला आहे.

जल्लोष करताना कार्यकर्ते

By

Published : May 24, 2019, 6:08 AM IST

सांगली- सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विद्यमान खासदार संजयकाका पाटलांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. काँग्रेस आघाडीच्या स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा लाखांच्या मतांच्या फरकाने पराभव करत आपला गड राखला आहे.

जल्लोष करताना कार्यकर्ते


सांगली लोकसभा मतदार संघातील अत्यंत चुरशीने पार पडलेल्या तिरंगी लढतीत भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी पुन्हा एकदा बाजी मारत निर्विवाद विजय मिळवला आहे. २३ एप्रिल रोजी सांगली लोकसभा मतदार संघासाठी मतदान पार पडले होते. गुरुवारी या निवडणुकीचा निकाल लागला आहे. यात पुन्हा एकदा भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील खासदार बनले आहेत. वैक्तिक आरोप-प्रत्यारोप, घराणेशाहीमुळे सांगलीची निवडणूक रंगतदार बनली होती.

भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार संजयकाका पाटील काँग्रेस आघाडीचे स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर अशी तिरंगी लढत या मतदारसंघात होती. तर ६५.३८ टक्के इतके मतदान झाले होते. गत निवडणुकीच्या टक्केवारीपेक्षा सव्वा टक्के अधिक मतदान झाल्याने, वाढलेला टक्का कोणाला धक्का देणार ? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी बाजी मारत पुन्हा एकदा सांगलीचे खासदार होण्याचा बहुमान मिळवला आहे. संजयकाका पाटील यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी सांगली शहरासह जिल्ह्यात एकच जल्लोष केला आहे.

निवडणुकीच्या काळात आपल्यावर अनेक जहरी टीका झाल्या, घराणेशाहीच्या माध्यमातून अनेक आरोप करण्यात आले, मात्र या सर्वांना सांगली जिल्ह्यातल्या सुज्ञ जनतेने उत्तर दिले आहे. तसेच या निवडणुकीत जातीयवादाचे विष कालवण्याचा प्रयत्नही सांगलीकरांनी उधळून लावल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details