वैद्यमापन कार्यालयाचा कारभार राम भरोसे ! भाजपने रिकाम्या कार्यालयाच्या दारावर चिटकवले निवेदन - सांगलीत भाजपचे आंदोलन
साखर कारखानादारांच्या काटा मारी विरोधात निवेदन देण्यासाठी वैद्यमापन शास्त्र या शासकीय कार्यालयात पोहोचलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना ओस पडलेल्या कार्यालयात तब्बल 2 तास ताटकळत राहावं लागल्याचा प्रकार सांगलीमध्ये घडला आहे.

bjp agitation against government office
सांगली - साखर कारखानादारांच्या काटा मारी विरोधात निवेदन देण्यासाठी वैद्यमापन शास्त्र या शासकीय कार्यालयात पोहोचलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना ओस पडलेल्या कार्यालयात तब्बल 2 तास ताटकळत राहावं लागल्याचा प्रकार सांगलीमध्ये घडला आहे. कार्यालयात ना शिपाई, ना अधिकारी. त्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी थेट कार्यालयाच्यादारावर निवेदन चिकटत वैधमापन कार्यालयाच्या कारभाराचा निषेध नोंदवला आहे.
भाजपचे सांगली जिल्हा (ग्रामीण) माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड
Last Updated : Jan 22, 2021, 12:34 AM IST