सांगली - मध्यप्रदेशातील सेवादलाच्या कार्यक्रमात प्रकाशित झालेल्या पुस्तकात सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण केल्याप्रकरणी भाजपने रविवारी सांगलीत काँग्रेस विरोधात आंदोलन केले. भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करत काँग्रेस पक्षाचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
काँग्रेसच्या सेवादलाच्या पुस्तकात वीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. यावरून देशभर काँग्रेस विरोधात तीव्र पडसाद उमटत आहेत. सांगलीतही भाजपकडून काँग्रेस पक्षाविरोधात रविवारी आंदोलन करण्यात आले. सांगली शहरातील राम मंदिर चौकात सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.