महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Biscuits fertilizer for Grapes Farming : द्राक्षाच्या झाडांसाठी चक्क बिस्किटांचा खुराक - Glucose Biscuits fertilizer

द्राक्ष शेतीला खुराक म्हणून चक्का बिस्किटचा (Biscuits fertilizer for Grapes Farming) वापर करण्यात आला आहे.तासगावच्या एका शेतकऱ्याने आपल्या दोन एकर द्राक्षबाग शेतीमध्ये खता प्रमाणे ग्लुकोज बिस्किटांचा (Glucose Biscuits) वापर केला आहे.

Grapes farming
Grapes farming

By

Published : Jan 2, 2022, 12:00 PM IST

Updated : Jan 2, 2022, 12:27 PM IST

सांगली - द्राक्ष शेतीला खुराक म्हणून चक्का बिस्किटचा (Biscuits fertilizer for Grapes Farming) वापर करण्यात आला आहे.तासगावच्या एका शेतकऱ्याने आपल्या दोन एकर द्राक्षबाग शेतीमध्ये खता प्रमाणे ग्लुकोज बिस्किटांचा (Glucose Biscuits) वापर केला आहे. पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला असून त्याचा द्राक्ष उत्पादनावर चांगला परिणाम होईल,असा विश्वास द्राक्ष उत्पादक शेतकरी नितीन तळेकर यांनी व्यक्त केला आहे.

द्राक्ष शेतीत अनोखा प्रयोग
गेल्या दोन-तीन वर्षांपासून सांगली जिल्ह्यातला द्राक्ष बाग शेतकरी निसर्गाच्या अनेक संकटामुळे अडचणीत आला आहे.नुकत्याच अवकाळी पावसाने द्राक्ष बाग शेतकऱ्यांची अक्षरशा कंबरडे मोडले आहे.त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या द्राक्ष उत्पादनासाठी विविध औषध,खतांचा वापर करण्याबरोबर नवनवीन प्रयोग करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.यातूनच तासगावच्या सावळज येथील एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये एक अनोखा प्रयोग केला आहे.तो म्हणजे खत म्हणून बिस्कीटचा वापर केला आहे. जवळपास दोन एकर बागेत नितीन तारळेकर या शेतकऱ्याने त्यांच्याकडे असणारे पार्ले आणि इतर बिस्किट हे द्राक्ष शेतीसाठी खुराक म्हणून वापरली आहेत.
बिस्कीटातील प्रोटीन द्राक्षांनाही उपयुक्त
याबाबत नितीन तळेकर सांगतात, आपल्याकडे बिस्किटची एजन्सी आहे. यामध्ये काही बिस्किटांचा कालावधी संपला होती.त्यामुळे या बिस्कीटचे काय करायचं हा प्रश्न होता ? आपली साडेचार एकर द्राक्ष बाग शेती आहे,सध्या अनेक संकटांतून ही द्राक्ष शेती आपण करतो आहे.या द्राक्ष शेतीमध्ये प्रोटीन युक्त असणारी बिस्किट वापरल्यास त्याचा फायदा होईल का ? याचा विचार आपल्यासमोर आला.त्यादृष्टीने तासगाव तालुक्यातला काही द्राक्ष तज्ञांशी चर्चा करून, याचा द्राक्ष उत्पादनावर चांगला परिणाम होऊ शकतो या धारणेने पहिल्यांदाच हा प्रयोग केला आहे.पुढील हंगामात परिणाम
दोन एकर द्राक्ष बाग शेतीमध्ये एक आड एक द्राक्ष सरी मध्ये 5 रुपये किंमत असणाऱ्या एक बिस्किटचा पुडा झाडाच्या खोडव्यात खताप्रमाणे टाकला आहे.आता ही किती परिणामकारक आहेत किंवा त्याचा उत्पादनावर किती प्रमाणात प्रभाव होऊ शकतो,हे पुढच्या हंगामात दिसून येणार आहे. मात्र, आपल्याला खात्री आहे, की याचा नक्कीच फायदा होईल,असा विश्वास नितीन तारळेकर यांनी व्यक्त केला आहे.
उपयुक्त ठरल्यास शेतकाऱ्यांना फायदा
वास्तविक बिस्किट हे लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सगळेच खातात,अगदी प्राणी देखील बिस्कीट चवीने खातात,मात्र आता याच बिस्किटांचा वापर द्राक्ष शेतीसाठीही करण्यात आला आहे.खरं तर हा पहिलाच प्रयोग असून भविष्यात या बिस्कीटच्या वापराचा द्राक्ष शेतीवर चांगला परिणाम झाल्यास,अगदी कमी खर्चात हे खत म्हणून शेतकऱ्यांच्या साठी नक्कीच फायदेशीर ठरू शकेल, असा विश्वासही शेतकरी नितीन तारळेकर यांनी व्यक्त केला आहे.
Last Updated : Jan 2, 2022, 12:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details