सांगली - पंखांमध्ये मांजा दोर अडकून ३ दिवसांपासून एका झाडावर अडकलेल्या घारीची रेस्क्यू ऑपरेशनद्वारे सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सांगलीतील प्राणीमित्र आणि पालिकेच्या अग्निशमन पथकाने रेस्क्यू करत घारीला जीवदान दिले आहे.
तीन दिवसांपासून झाडावर अडकलेल्या घारीची सुखरूप सुटका
उंच झाडावर घार अडकल्याचे लक्षात येताच त्यांनी सांगली महापालिकेच्या अग्निशमन पथकला मदतीसाठी पाचारण केले.
सांगली शहरातील वॉटर हाऊसच्या मागे एका झाडावर गेल्या तीन दिवसांपासून घार अडकून होती. तिच्या पंखांभोवती नॉयलन मांजाचा दोर अडकला होता. त्यामुळे तिला उडता येत नसल्याने ती झाडावर अडकून होती. घारीच्या ओरडण्याने येथील नागरिकांनी घार अडकल्याची कल्पना प्राणीमित्रांना दिली. यानंतर काही वेळातच प्राणिमित्र मुस्तफा मुजावर आपल्या टीमसह याठिकाणी दाखल झाले. उंच झाडावर घार अडकल्याचे लक्षात येताच त्यांनी सांगली महापालिकेच्या अग्निशमन पथकला मदतीसाठी पाचारण केले. एका तासांच्या रेस्क्यूनंतर झाडावर अडकलेल्या घारीला खाली उतरवले. यानंतर तिच्या पंखांमध्ये अडकलेल्या मांजाचा गुंता सोडवला आणि तीन दिवसांपासून अडकून पडलेल्या घारीची सुटका करण्यात आली.