सांगली - जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर कृष्णा नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली होती. मात्र ती आता ओसरत आहे. आता कृष्णा नदीला माश्यांचा पूर आला आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. अक्षरशः नागरिकांनी गाड्या भरून मासे पकडले.
अगदी सहज रित्या शेकडो मासे जाळ्यात येऊन पडत होते. या माश्यांना बारडीने बाहेर काढून ते बॉक्समध्ये भरण्यात आले. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये एका जाळ्यात शेकडो मासे सापडत होते. दोन जाळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे मासे पकडण्यात येत होते आणि जवळपास दोन गाड्या भरून यावेळी मासे पकडण्यात आले आहेत. बंधाऱ्यातून खाली पडणाऱ्या माश्यांचा या ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध उड्याही पाहायला मिळत होत्या.