महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Crime : विद्यार्थ्यांच्या महागड्या सायकली चोरणारा चोरटा अटकेत; 20 महागड्या सायकली जप्त - सांगलीत सायकल चोरास अटक

महागड्या सायकली चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्यास विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले (Bicycles Thief arrested in Sangli) आहे. (Sangli Crime) त्याच्याकडून एक लाख 23 हजार किंमतीच्या 20 सायकली जप्त करण्यात (20 expensive bicycles seized) आल्या आहेत. वरूण पांढरे असे या सायकल चोरट्याचे नाव आहे. (latest news from Sangli)

Bicycles Thief arrested in Sangli
सायकली चोरणारा चोरटा अटकेत

By

Published : Dec 23, 2022, 4:06 PM IST

सांगली :विश्रामबाग हद्दीमधून गेल्या काही दिवसांपासून सायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. (Sangli Crime) या सायकल चोरीचा तपास सुरू असताना शहरातल्या कॉलेज कॉर्नर या ठिकाणी एक तरुण सायकल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वरूण पांढरे (वय 18) या तरुणाला ताब्यात (Bicycles Thief arrested in Sangli) घेऊन त्याच्याजवळ असणाऱ्या सायकली बाबत विचारपूस केली. सुरुवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पण सखोल चौकशी केली असता, या सायकली चोरीच्या असल्याचे समजले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने विश्रामबाग परिसरातील अभ्यंकर क्लासेस या ठिकाणी क्लाससाठी येणारया विद्यार्थ्यांच्या, तसेच क्रांती भेळ येथे खाण्यासाठी येणाऱ्या मुलांच्या आणि आसपासच्या विश्रामबाग हद्दीतून सुमारे 20 सायकली चोरल्याची कबुली (20 expensive bicycles seized) दिली आहे.

चोरीच्या सायकली जप्त :विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये वरूण पांढरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरण्यात आलेल्या 20 महागड्या सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांच्या किंमती या 4000 पासून 11,000 पर्यंत आहेत. अशा जवळपास एक लाख 23 हजार किंमतीच्या सायकली, विश्रामबाग पोलिसांकडून सायकल चोर वरून पांढरे याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details