सांगली -सरकार पूरग्रस्तांना भीक देतेय का? अश्या शब्दात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सरकारला सुनावले आहे. पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीवरुन त्यांनी सरकारवर टिका केली आहे. पूरग्रस्तांना राज्यातुन आलेली मदत मिळालीच पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली आहे. सांगलीतील पूर परिस्थिती पाहणी वेळी तृप्ती देसाई बोलत होत्या.
सरकार पूरग्रस्तांना भीक देतेय का? भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई सरकारवर कडाडल्या - सांगली पूर
राज्यातील अनेक ठिकाणाहून पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत येत आहे. मात्र, ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. प्रत्येक पूरग्रस्तांपर्यंत ही मदत पोहचली पाहिजे. अनेक ठिकाणी मदत मिळण्यासाठी मोठा विलंब होत आहे. पूरग्रस्तांना तासं-तास रांगेत उभा राहावे लागत आहे.
सांगली जिल्ह्यात महापुराने उद्भवलेल्या परस्थितीची भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सोमवारी पाहणी केली आहे. सांगली शहर त्याचबरोबर हरिपूर येथील अनेक भागात जाऊन तृप्ती देसाई यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी अनेक नागरिकांनी सरकारकडून देण्यात येणारी मदत अद्याप मिळाली नसल्याचे सांगितले. तसेच अनुदान मदतीमध्ये येणाऱ्या सरकारी निकषांच्या अडचणी मांडल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तृप्ती देसाई यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.
राज्यातील अनेक ठिकाणाहून पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत येत आहे. मात्र, ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. प्रत्येक पूरग्रस्तांपर्यंत ही मदत पोहचली पाहिजे. अनेक ठिकाणी मदत मिळण्यासाठी मोठा विलंब होत आहे. पूरग्रस्तांना तासं-तास रांगेत उभा राहावे लागत आहे. त्यामुळे सरकार पूरग्रस्तांना भीक देतेय का? अशा शब्दात तृप्ती देसाई यांनी सरकारला सुनावले आहे. प्रत्येक पूरग्रस्ताला मदत मिळावी यासाठी प्रशासनाने योग्य पद्धतीने यंत्रणा राबवली पाहिजे. अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.