महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अयोध्येत मशिदी ऐवजी रुग्णालय; भीमसेनेकडून लाडू वाटून निर्णयाचे स्वागत - भीमसेनेकडून सुन्नी बोर्डाच्या निर्णयाचे स्वागत

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानंतर सुन्नी वक्फ बोर्डाकडून न्यायालयाने मशीद उभारण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला दिलेल्या जागेवर हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या जागेवर अद्यावत हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय वक्फ बोर्डाकडून जाहीर करण्यात आला. बोर्डाच्या या निर्णयाचं सांगलीमध्ये भीम सेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

Sangli bhim sena news
Sangli bhim sena news

By

Published : Aug 10, 2020, 10:43 AM IST

सांगली- आयोध्येमध्ये मशीद उभारण्या ऐवजी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय सुनी वक्फ बोर्डाने घेतला आहे. या निर्णयाचे सांगली मध्ये भीम सेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्याबद्दल शहरांमध्ये भीम सेनेच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले.

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानंतर सुन्नी वक्फ बोर्डाकडून न्यायालयाने मशीद उभारण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला दिलेल्या जागेवर हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या जागेवर अद्यावत हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय वक्फ बोर्डाकडून जाहीर करण्यात आला. बोर्डाच्या या निर्णयाचं सांगलीमध्ये भीम सेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली वक्फ बोर्डाच्या या निर्णयाचं स्वागत म्हणून शहरातल्या स्टेशन चौक या ठिकाणी नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुन्नी वक्फ बोर्डाकडून घेण्यात आलेला निर्णय हा समाजाच्या हिताचा असून या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे, असे मत यावेळी भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश मोहिते यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details