महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमधील लढाई निष्क्रिय विरुद्ध सक्रिय, भास्कर जाधवांचा गींतेवर निशाणा - ANANT GITE

रायगड मतदारसंघातील लढाई निष्क्रिय विरुद्ध सक्रिय.. राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधवांनी युतीचे उमेदवार अनंत गीतेंवर साधला निशाणा...गीते म्हणजे मतांचा मेवा खाणारे उमेदवार असल्याचीही केली टीका

भास्कर जाधवांचा गींतेवर निशाणा

By

Published : Apr 14, 2019, 12:12 PM IST


रत्नागिरी- गीतेंविरोधातली ही लढाई नुसती आरोपांची नाही, तर एका बाजूला निष्क्रिय आणि एका बाजूला सक्रिय, अशी ही लढाई आहे. मतांचा मेवा घेऊन जाणारे हवे आहेत की, सेवा देणारे, याचा विचार करा आणि तटकरे साहेबांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहनही राष्ट्रवादीचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांनी मतदारांना केले.

भास्कर जाधवांचा गींतेवर निशाणा

रायगड लोकसभा मतदारसंघातील महाआघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ गुहागरमध्ये झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेसह भाजपवर जोरदार टीका केली. त्याचसोबत अनंत गींतेचाही त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वैचारिकदृष्ट्या खालावलेले असून ते इतरांच्या कुटुंबावर बोलायला लागले असल्याची टीकाही जाधव यांनी केली. अच्छे दिन, काळा पैसा, खात्यामध्ये १५ लाख टाकण्याची आश्वासने म्हणजे फक्त भूलथापा असल्याची टीकाही भास्कर जाधव यांनी यावेळी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details