महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sangli Crime: भिकारी महिलेचा खून करून मृतदेह टाकला अर्धनग्न अवस्थेत; पोलिसांचा तपास सुरू - महात्मा गांधी पोलिस चौकी

Sangli Crime: मिरज शहरात एका महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्ध नग्न अवस्थेमध्ये ही महिला आढळून आली आहे, तर सदर महिला ही भिकारी असून तीची ओळख अद्याप पटली नाही. तर वर्मी घाव घालून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Sangli Crime
Sangli Crime

By

Published : Oct 23, 2022, 9:31 PM IST

सांगली: मिरज शहरात एका महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्ध नग्न अवस्थेमध्ये ही महिला आढळून आली आहे, तर सदर महिला ही भिकारी असून तीची ओळख अद्याप पटली नाही. तर वर्मी घाव घालून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

महिलेचा मृतदेह आढळला:मिरज मध्यवर्ती बसस्थानक मागील मोकळ्या जागेत एका महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. बसस्थानक मागील मोकळ्या जागेत सदर महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पडल्याचे एसटी कर्मचाऱ्यांना छतावरून दिसले. तिची हालचाल होत नसल्याने ती जिवंत आहे का ? याची खात्री करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सुरक्षारक्षकाला घटनास्थळी पाठवून दिले. यावेळी महिलेच्या कपाळावर गंभीर जखम होऊन रक्ताने माखलेल्या मृत अवस्थेत आढळून आली.

पोलिसांचा तपास सुरू:सदर घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौकी पोलिसाना घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्राथमिक तपासात सदर महिला भिकारी असून या भागात नश्या करून फिरताना अनेकांनी तिला पाहिले असल्याचे समोर आले आहे. मात्र सदरच्या महिलेचं नाव आणि नेमके ही हत्या कोणी ? व कोणत्या कारणातून केली, हे अद्याप समजू शकले नसून याप्रकरणी महात्मा गांधी चौकी Mahatma Gandhi Police Station पोलिसांच्याकडून अधिक तपास सुरू असल्याचा सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details