सांगली - सध्या कोरोनामुळे पोलीस बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता आपली सेवा करत असतात. पोलीस सुरक्षित तर जनता सुरक्षित राहील यासाठी तांदुळवाडी येथील बापुसाहेब बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष बापुसाहेब कांबळें व शशिभूषण कांबळें यांनी शिराळा व कुरळप पोलीस स्टाफला मास्कचे वाटप केले.
बापुसाहेब बहुउद्देशीय सेवा संस्था तांदुळवाडी यांच्यावतीने शिराळा तालुका, कुरळप पोलिसांना केले मास्क वाटप - TANDULWADI SANGLI
तांदुळवाडी येथील बापुसाहेब बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष बापुसाहेब कांबळें व शशिभूषण कांबळें यांनी शिराळा व कुरळप पोलीस स्टाफला मास्कचे वाटप केले.

बापुसाहेब कांबळें व शशिभूषण कांबळें हे आपत्तीच्या काळात प्रत्येकाला मदत करण्यासाठी धावून जात असतात. सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला महापुराने वेढले होते तेव्हाही जी गावे पाण्याखाली गेली होती त्या गावातील लोकांना अन्न वाटप केले होते. तर, बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांनाही जेवणाची सोय करण्यात आली होती.
अडचणीच्या काळामध्ये लोकांना मदत करण्यासाठी बापुसाहेब बहुउद्देशीय सेवा संस्था ही नेहमी अग्रेसर असते. म्हणून शिराळा पोलीस स्टेशनचे व कुरळप पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील व अरविंद काटे यांनी बापुसाहेब कांबळें व शशिभूषण कांबळें यांचे आभार मानले आहेत.