सांगली- येथे 50 लाखांचा एटीएम घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या सांगली आणि कोल्हापूरच्या जयसिंगपूर मधील एटीएममध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सीएमएस इन्फो सिस्टीम कंपनीच्या दोघा विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोद्याच्या एटीएममध्ये 50 लाखांचा घोटाळा; आरोपी फरार - sangli
सांगलीत 50 लाखांचा एटीएम घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या सांगली आणि कोल्हापूरच्या जयसिंगपूर मधील एटीएममध्ये हा प्रकार घडला आहे.
सांगलीतील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोद्याच्या सांगली आणि कोल्हापूरच्या जयसिंगपूर येथील पाच एटीएममध्ये सुमारे 50 लाख 55 हजारांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. बँकेच्या लेखा परीक्षणात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मुंबईच्या सीएमएस इन्फो सिस्टीम कंपनीकडे सांगली महापालिका क्षेत्र आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर मधील सुमारे 24 एटीएममध्ये पैसे भरण्याची एजन्सी आहे. तर या कंपनीच्या सांगलीतील हितेश पटेल आणि अक्षय पाटील यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या 12 एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी होती. या दोघांनी संगनमताने सांगलीतील 4 आणि कोल्हापूच्या जयसिंगपूर मधील 1 अश्या 5 एटीएममध्ये पैसे न भरत घोटाळा केल्याचा समोर आले आहे. यात स्टेट बँकेचे 48 लाख 3 हजार तर बँक ऑफ बडोदाचे 2 लाख 52 हजार हडप केले आहेत. दोन्ही बँकांच्या लेखापरीक्षण तपासणीमध्ये या घोटाळयाचा प्रकार उघडकीस आली आहे. यानंतर बँकेच्या वतीने संशियत हितेश पटेल आणि अक्षय पाटील या दोघांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी हितेश पटेल हा सीएमएस कंपनीमध्ये 12 वर्षांपासून तर अक्षय पाटील हा दीड वर्षांपासून काम करत असल्याचे समोर आले आहे. सध्या दोघेही फरार असून या दोघांचा शहर पोलीसांकडून शोध घेण्यात येत आहे.