सांगलीजत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी उत्तर प्रदेश येथील चार साधूंना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कर्नाटक मधून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात असताना लवंगा या ठिकाणी रस्ता विचारण्यासाठी थांबलेल्या साधूंना चोर समजून जमावाने हे बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. मात्र साधुंनी गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा स्पष्ट करत कोणतीही तक्रार न देता पंढरपूरकडे निघून गेले होते. मात्र या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाल्यानंतर सांगली पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन उमदी पोलीस ठाण्यामध्ये साधूंच्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केले ( case of beating of sadhus in Sangli ) होते.
सांगली साधू मारहाण प्रकरणी अटक केलेल्या सात आरोपींना जामीन मंजूर - jat court
साधू मारहाण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही संशयित आरोपींना जत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उत्तरप्रदेशच्या मथुरा येथील चार साधुंना मुले चोरणारी टोळी समजून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. यानंतर उमदी पोलिसांनी याप्रकरणी 25 जणांच्यावर गुन्हा दाखल करत सात जणांना अटक केली होती.
सात आरोपींना जामीन मंजूर याप्रकरणी 25 जणांच्यावर गुन्हा दाखल करत सात जणांना अटक केली होती. साधू मारहाण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही संशयित आरोपींना जत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उत्तरप्रदेशच्या मथुरा येथील चार साधुंना मुले चोरणारी टोळी समजून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या सात जणांना आज गुरुवारी जत येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी व बचाव पक्षाचे वकील यांच्यामध्ये जमीन मंजुरीवरून जोरदार युक्तिवाद झाला, मात्र जत न्यायालयाने सातही संशयित आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
साधूंना चोर समजून जमावाने केली होती बेदम मारहाण रस्ता विचारण्यासाठी थांबलेल्या साधूंना चोर समजून जमावाने हे बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. मात्र साधुंनी गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा स्पष्ट करत कोणतीही तक्रार न देता पंढरपूरकडे निघून गेले होते. मात्र या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला होता.