महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हाथरस अत्याचार: सांगलीत बहुजन मुक्ती मोर्चाचे धरणे आंदोलन

हाथरस घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी व त्यांच्यावर कडक कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली.

सांगलीत बहुजन मुक्ती मोर्चाचे धरणे आंदोलन
सांगलीत बहुजन मुक्ती मोर्चाचे धरणे आंदोलन

By

Published : Oct 8, 2020, 8:59 PM IST

सांगली- हाथरस घटनेच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले असून यात मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

माहिती देताना सांगलीच्या माजी नगरसेविका शेवंता वाघमारे

हाथरस घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी व त्यांच्यावर कडक कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. त्याचबरोबर, देशभरात मोठ्या प्रमाणात महिलांवरील अत्याचार वाढत आहे. त्यासाठी सरकारने कडक पावले उचलावीत. नुकतेच कृषी विधेयकाविरोधात दिल्लीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे. अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

हेही वाचा-'प्रकाश आंबेडकरांनी भडकावू वक्तव्य करू नये, अन्यथा मराठा समाजात उद्रेक होईल'

ABOUT THE AUTHOR

...view details