सांगली - कृष्णा नदीतील मगरींचा वाढता वावर आणि नागरिकांवर होणारे हल्ले, या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून कृष्णा नदीत गस्त सुरू करण्यात आली आहे. मगरींच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
वनविभागाकडून कृष्णा नदीत गस्त, मगरींच्या हालचालीवर ठेवणार लक्ष - crocodile
कृष्णा नदीतील मगरींचा वाढता वावर आणि नागरिकांवर होणारे हल्ले, या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून कृष्णा नदीत गस्त सुरू करण्यात आली आहे.
सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात सध्या मगरींचा वावर वाढला आहे. नदी पात्रात सुमारे २० ते २२ मगरी असल्याचे वन विभागाच्या सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे. तर मगरींची पिल्लेही मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यात या मगरींचे नागरिकांवर हल्ले वाढले आहेत.
गेल्या महिन्यात मौजे डिग्रज नजीक येथे एका १२ वर्षीय मुलावर मगरीने हल्ला चढवत ठार केले होते. तर याआधीही मगरींकडून नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने नदीत पोहण्यासाठी मुले गर्दी करत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून मगरींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून नदी पात्रता गस्त घालण्यात येत आहे. सांगलीच्या बंधाऱ्यापासून डिग्रजच्या बंधाऱ्यापर्यंत बोटीने गस्त घालण्यात येत आहे. तसेच नदी काठी येणाऱ्या नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.