सांगली : जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस ठाण्याच्या शेजारीच तेही पोलिस अधिकाऱ्याची घरीच ( police sub inspector house ) चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न ( Attempted theft in the police sub inspector house ) केला आहे. मात्र चोरांच्या हाती काही लागले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Sangli Crime : धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकाच्या घरात चोरीचा प्रयत्न... - उपनिरीक्षकाच्या घरात चोरीचा प्रयत्न
सांगली जिल्ह्यातील मिरज ( Miraj in Sangli ) शहराच्या पोलीस ठाणे शेजारीच असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाच्या घरामध्ये चोरीचा ( theft in the police sub inspector house ) प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. शहरातल्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या शेजारी हा प्रकार घडला आहे. पण चोरट्यांच्या हाताला काहीच लागले नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या घरी चोरिचा प्रयत्न : मिरज शहराच्या महात्मा गांधी चौथी पोलीस उपनिरीक्षक असणारे अकिब काझी यांचा बंगला आहे. काझी हे हज यात्रेसाठी गेले आहेत. तर घरी असणारा मुलगा आणि सून हे काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या जयसिंगपूर येथे नातेवाईकांकडे गेले होते. याच दरम्यान घर बंद असल्याचा डाव साधत,चोरट्यांनी काझी यांच्या घराचा दरवाजा फोडून प्रवेश केला. त्यानंतर घरात असणारे कपाट तिजोरी फोडून त्यातील असणारे साहित्य घरभर विस्कटून टाकले, आणि सोने-चांदीचे दागिने किंवा रोख रक्कम मिळते का यासाठी चोरट्यांनी घर अक्षरशः पालथ घातला त्यामुळे घरातले बेडरूम आणि हॉल या ठिकाणी साहित्य आता व्यस्त पडले होते.
गुन्हा दाखल : मात्र चोरट्याच्या हाताला काहीच लागले नाही. सोमवारी सकाळी काझी यांचा मुलगा आणि सून परतले असता त्यांच्या घरामध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याच्या प्रकार समोर आला आहे,याघटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौकी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र पोलीस ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक याच्या घरात चोरीच्या घटनेमुळे मिरज शहरामध्ये खळबळ उडाली आहे.