महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sangli Accident: सातारा-महाबळेश्वर राज्यमार्गावर ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात; चौघेजण जागीच ठार, एक गंभीर - भीषण अपघात

विटा येथे खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघे जण जागीच ठार झाले आहेत, तर एकजण गंभीर जखमी आहेत. पोलीस पुढील तपास करत आहे.

Travel Bus And Car Accident
वाहनांची समोरासमोर भीषण धडक

By

Published : May 4, 2023, 11:54 AM IST

सांगली : विटा येथे खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर भीषण धडक होऊन चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. तर या गाडीतील एक जण बचावला असून तो गंभीर जखमी आहे. विटा येथील सातारा-महाबळेश्वर राज्यमार्गावर भरधाव कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. सकाळी सातच्या सुमारास विटा हद्दीतील शिवाजीनगर येथे हा भीषण अपघात घडला आहे.

चौघेजण जागीच ठार :या अपघातात चारचाकी गाडी चालकासह चौघेजण जागीच ठार झाले आहेत. यातील मृत तिघे हे एकाच कुटुंबातील आहे. ते तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील राहणारे आहेत. तर गाडी चालक हा मुंबई येथील रहिवासी आहे. सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी (सर्व रा.गव्हाण,ता.तासगांव) आणि गाडी चालक योगेश कदम असे मृतांची नावे आहेत. चालक योगेश कदम हा मालाड (मुंबई) येथील आहे.



दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक :तासगावच्या गव्हाण येथील काशीद कुटुंब, हे मुंबईहुन तासगावकडे विट्या मार्गी येत होते. तर विट्याहून महाबळेश्वर राज्य मार्गावरून साताऱ्याकडे गीतांजली कंपनीची खाजगी ट्रॅव्हल्स निघाली होती. सकाळी सातच्या सुमारास शिवाजीनगर येथे दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी भीषण होती, यामध्ये चार चाकी गाडीचा अक्षरशः चक्काचुर झाला. ज्यामध्ये गाडीत असणारे चौघेजण जागीच ठार झाले. तर गाडीतले असणारे सदानंद काशीद हे एअर बॅग वेळीच उघडल्याने बचावले आहेत. या अपघातानंतर विटा-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी सातच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. घटनेनंतर विटा पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.




हेही वाचा : Pune Accident News: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीला वाचविण्याच्या नादात खासगी बस उलटली, दहा प्रवासी जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details