सांगली - जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातून दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या खांद्यावर आहे. आर. आर. पाटील यांच्या पश्चात विधानसभेची ही निवडणूक खडतर नाही, पण सोपीही नाही, असे मत रोहित पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे.
आबांच्या पश्चात विधानसभेची निवडणूक खडतर नाही, पण सोपीही नाही - रोहित पाटील
तासगाव- कवठेमहांकाळ मतदार संघातून निवडणूक लढवत असलेल्या सुमनताई पाटील यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या खांद्यावर आहे. आर. आर. पाटील यांच्या पश्चात विधानसभेची ही निवडणूक खडतर नाही, पण सोपीही नाही, असे मत रोहित पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे.
हेही वाचा -राणे समर्थक सतीश सावंत कणकवलीतून अपक्ष लढणार; नितेश राणेंना फोडणार घाम?
रोहित म्हणाले, "सुमनताई पाटील यांनी केलेल्या कामाला प्रत्येक उमेदवाराच्या उंबरठ्यापर्यंत पोचवण्याचे काम आम्ही तरुणाई करत आहोत." गाफील न राहता काम केल्यास विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मतदारांच्या भेटीपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वच पातळीवर पक्षाचे काम जोमात सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रचारप्रक्रीयेत रोहित पाटील या निवडणुकीत अग्रेसर भूमिका बजावत आहेत.