सांगली :सेक्सेल सिमेन या प्रयोगशाळेमधील जेनेटिक सायन्समुळे दुग्ध क्षेत्रात क्रांती होईल,असे मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. तसेच सरकारवर अवलंबून राहू नका अन्यथा चालती गाडी पंक्चर होते, असा सल्ला देखील गडकरी यांनी दिला आहे. ते सांगलीच्या भिलवडी येथील चितळे डिअरमध्ये आयोजित समारंभात बोलत होते.
सेक्सेल सीमेन जेनेटिक प्रयोगशाळेचे उद्घाटन :पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन येथील चितळे उद्योग समूहाच्यावतीने वतीने आशिया खंडातील सर्वात मोठे सेक्सेल सीमेन जेनेटिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. सेक्सेल सीमेन जेनेटिक प्रयोगशाळेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
दूध क्षेत्रात क्रांती :यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, चितळे उद्योग समूहाकडून सेक्सेल सीमेन जेनेटिक प्रयोगशाळे निर्माण करण्यात आली आहे. ज्यामुळे दूध क्षेत्रात पुढील 100 वर्षात मोठी क्रांती होणार असून सामाजिक, अर्थीक मोठा परिणाम होईल. यात दूध उत्पादनात वाढ होण्या बरोबरच सशक्त गाई तसेच बैलची उत्पत्ती करता येणार आहे,
ऍग्रो प्रोसिसिंगला प्रोत्साहन : आज खेड्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. गावांमध्ये रोजगार नसल्याने नागरिक शहराकडे धाव घेता आहेत. त्यामुळे शहराच्या प्रशासनावर अधिक भार पडत असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले. गावात उद्योग नाही, व्यापार नाही, चांगल्या शाळा महाविद्यालने नाहीत. त्यामुळे कृषी क्षेत्रावर परिणाम होत असुन शेती क्षेत्राचा विकास खुंटला आहे. कृषी क्षेत्राचा विकास करायचा असेल, तर यामध्ये उत्पादकता वाढवली पाहिजे असे गडकरी म्हणाले. ऍग्रो प्रोसिसिंग इंडस्ट्रीज आणि आलाय इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.