महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंजूर निर्णयाचा अध्यादेश काढा अन्यथा.., आशा गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचा इशारा - आशा गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचे सांगलीत आंदोलन

आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यानी मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हा परिषदेसमोर अंदोलन केले. यावेळी मंजूर वाढीव मानधनाचा अध्यादेश काढा, अन्यथा बेमुदत संप करण्याचा इशारा त्यांनी दिला.

मंजूर निर्णयाचा अध्यादेश काढा या मागणीसाठी आसा गटप्रवर्तकांचे आदोलन

By

Published : Sep 3, 2019, 9:57 PM IST

सांगली -आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी सांगलीत आशा कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. तातडीने मंजूर मानधन वाढीचा अध्यादेश काढावा अन्यथा बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महिला कर्मचार्‍यांनी दिला आहे. सांगली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करत सरकारला हा इशारा दिला आहे.

मंजूर निर्णयाचा अध्यादेश काढा या मागणीसाठी आसा गटप्रवर्तकांचे आदोलन

आशा गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांच्या कायम मानधन वाढीसह विविध मागण्यांचा बाबत सरकार पातळीवर निर्णय झाला आहे. मात्र, त्याचा अध्यादेश अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आशा गटप्रवर्तक महिलांच्या मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे संतप्त आशा कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. सांगली जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातल्या आशा गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत राज्य सरकारने तातडीने मानधनवाढीचा अध्यादेश काढावा अशी मागणी केली आहे. सरकारने अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचा अध्यादेश काढण्यामध्ये सरकार चालढकल करत असल्याचा आरोप करत उद्यापर्यंत सरकारने आशा गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यांच्या अध्यादेश काढला नाही, तर गुरुवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यावेळी आशा वर्कर युनियन कडून देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details