सांगली- मोबाईलचे सीम कार्ड व्हेरिफिकेशनच्या ( SIM Card Verification ) नावाखाली एका सैनिकाला तब्बल नऊ लाखांना गंडा घालण्यात आला आहे. मिरज तालुक्यातील मानमोडी येथील प्रदीप राजाराम मुळीक या सैनिकाची ऑनलाइन फसवणूक ( Online Fraud ) झाली आहे. याबाबत कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात ( Kupwad MIDC Police Station ) गुन्हा दाखल झाला आहे.
सिम कार्ड बंद होण्याच्या भीतिने दिली माहिती
सैनिक प्रदीप मुळीक हे सुटी निमित्त मानमोडी या आपल्या गावी आले होते. दरम्यान, त्यांना तुमच्या मोबाईलच्या सिम कार्डचे व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे व्हेरिफिकेशन न केल्यास तुमचे कार्ड बंद होईल, असा संदेश अज्ञातांकडून आला. त्यानंतर मुळीक यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधल्यानंतर केवायसी रजिस्ट्रेशन पेंडिंग आहे, असे त्यांना सांगण्यात आले. सिम कार्ड बंद होईल या भीतीने मुळीक यांनी त्यांना केवायसीसाठीची सर्व माहिती दिली.