महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मटण दरवाढीला राज्य सरकारच जबाबदार - अण्णासाहेब डांगे - News related to meat price hike

मटणाच्या वाढलेल्या दराला सर्वस्वी राज्य सरकारचे धोरण जबाबदार आहे. जर कोणी दबाब आणून मटनाचे दर कमी करायचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा, आण्णासाहेब डांगे यांनी दिला.

Annasaheb Dange said the state government was responsible for  meat price hike
धनगर समाजाचे नेते आण्णासाहेब डांगे

By

Published : Jan 4, 2020, 5:12 PM IST

सांगली -मटणाच्या वाढलेल्या दराला सर्वस्वी राज्य सरकारचे आज पर्यंतचे धोरण जबाबदार आहे. मटणाची मागणी वाढली मात्र उत्पादन वाढले नाही. शेळ्या-मेंढ्या पालन व्यवसाय करणारा धनगर समाज आता केवळ 10 टक्केच हा व्यवसाय करत आहे. त्यामुळे दबाव आणून, कोणी मटणाचे दर कमी करायचा प्रयत्न करत असेल, तर आपण रस्त्यावर उतरू, असा इशारा धनगर समाजाचे नेते व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी दिला आहे. सांगलीच्या आष्टा येथे ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

धनगर समाजाचे नेते आण्णासाहेब डांगे

हेही वाचा - अन्न व औषध विभागाच्या कारवाईच्या भीतीने कोल्हापुरात मटण विक्री बंद

राज्यात विशेषता कोल्हापूरमध्ये मटणाच्या वाढलेल्या दरामुळे नागरिकांच्या मध्ये रोष पसरला आणि या वाढलेल्या मटणाच्या दराच्या विरोधात आंदोलनेही करण्यात आली. हा विरोध पाहता कोल्हापूरच्या महानगरपालिकेने मटण विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई सुद्धा केली. त्यामुळे वाढलेल्या मटणाच्या दराचा प्रश्न राज्यभर ऐरणीवर आला. मात्र, मटनाच्या वाढलेल्या दराच्या मुळाशी कोणाचे लक्ष गेले नाही आणि सर्व गोष्टीला आत्तापर्यंतच्या सरकारांचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप धनगर समाजाचे नेते व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केला आहे. या वाढलेल्या मटणाच्या दराच्या संदर्भात ईटीव्ही भारतने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अण्णासाहेब डांगे यांनी मटण विक्री व्यवसायाच्या बाबतीत सखोल भूमिका मांडली.

मटण म्हणजेच मांस विक्री हे प्रामुख्याने शेळ्या-मेंढ्यांचे आहे. हा शेळ्या-मेंढ्यां पालन व्यवसाय प्रमुख्याने धनगर समाजाचा राहिला आहे. पूर्वीच्या काळी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांपासून अनेक राजकीय नेत्यांकडून शेळ्या-मेंढ्यांचे मोठ्या प्रमाणात पालन होत होते. मात्र, धनगर समाज प्रामुख्याने भटकंती करत शेळ्या-मेंढ्या पाळत होता. शेतकऱ्यांच्या शेतात लक्ष्मी म्हणून आणि खत म्हणून या शेळ्या-मेंढ्यांना पाचारण करण्यात येत होते. मात्र, काळ बदल्यानंतर शेतात रासायनिक खतांचा वापर सुरू झाल्याने, याच शेळ्या-मेंढ्यांना शेतातून हाकलून देण्यात आले. शेळ्या-मेंढ्या पालन करणाऱ्या धनगर समाजावर हल्ले करण्यात आले. वनखात्याच्या हद्दीत सुद्धा शासकीय अधिकारी यांच्याकडून शेळ्या-मेंढ्याना मज्जाव करण्यात आला. अनेक वेळा त्यांचावर कारवाई सुद्धा करण्यात आली, इतकेच नव्हे तर या व्यवसायाला समाजात प्रतिष्ठासुद्धा मिळाली नाही. नेहमीच तुच्छतेने याकडे पहायले जात असे, त्यामुळे 100 टक्के मधील 90 टक्के धनगर समाजाने या व्यवसायापासून फारकत घेत अन्य मार्ग स्वीकारले. परिणामी हा व्यवसाय कमी होत गेला. मात्र, दुसऱ्या बाजूला मांस खाणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली आहे. त्यामुळे मागणी वाढली, पण पुरवठा कमी असल्यामुळे मटणाचे दर वाढले आहेत, याच्या मुळाशी कोणाला जायला वेळ नाही.

हेही वाचा - मटणदरवाढीचा मुद्दा गरम असतानाच कोल्हापुरात शेळ्या चोरीची घटना; शेळी चोर पोलिसांच्या ताब्यात

धनगर समाजाचे नेते स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे यांनी त्यावेळी धनगर समाजाच्या या व्यवसायला प्रगत करण्यासाठी अहिल्यादेवी शेळी-मेंढ्या पालन महामंडळाची निर्मिती केली. मात्र, या महामंडळाला जो निधी आवश्यक होता, तो पुढ्याच्या सरकारने उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आजही हे महामंडळ अडगळीत आहे. त्यामुळे धनगर समाजाने शेळी-मेंढ्या पालन व्यवसाय करणे सोडून दिले आहे. याच्या परिणामामुळे आज शेळ्या-मेंढ्यांचे उत्पादन वाढू शकले नाही. मात्र, मटण खाणाऱ्यांची संख्या वाढली आणि मटणाचे दरही वाढले आहेत.

दर वाढले म्हणून कोणी खाटीक समाजावर दबाव आणून मटणाचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला, तर आपण प्रसंगी या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी आण्णासाहेब डांगे यांनी यावेळी दिला आहे. या मटण दरवाढीला आज पर्यंतच्या सरकारचे धनगर समाज आणि त्यांच्या शेळी-मेंढ्या पालन व्यवसायाकडे केलेलं दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details