सांगली -भाजपमध्ये जाणाऱ्यांना आपले भवितव्य अंधारमय वाटत असेल कदाचित त्यामुळेच सत्तेच्या आश्रयाला काही नेते जात आहेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतेआणिमाजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर केली आहे.
भवितव्य अंधारमय वाटत असल्याने काही नेते सत्तेच्या आश्रयाला - आण्णासाहेब डांगे - पक्षांतर
आपले भवितव्य अंधारमय वाटत असल्याने काही नेते सत्तेच्या आश्रयाला जाण्यासाठी धडपडत आहेत. अशा शब्दात भाजपात जाणाऱ्या नेत्यांवर माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आण्णासाहेब डांगेंनी टीका केली आहे.
नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा उभारी घेईल
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप आणि शिवसेनेमध्ये पक्षांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. राष्ट्रवादीतील या आऊट गोइंगबद्दल बोलताना राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. भाजपमध्ये जाणाऱ्यांना कदाचित आपले भवितव्य अंधारमय वाटत असेल, म्हणून ते जात असावेत. पण राष्ट्रवादीतुन बाहेर पडल्यामुळे राष्ट्रवादीवर याचा काही परिणाम होणार नाही. राष्ट्रवादीची नवी पिढी तयार आहे, नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास डांगे यांनी यावेळी व्यक्त केला.