महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' लोकांची काळजी सरकार घेतंय, म्हणून 'या' प्राण्यांना आम्ही संभाळतोय - अशोक लकडे प्राणीमित्र मिरज सांगली

एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला की, त्याला रुग्णालयात आणि त्याच्या घरातील व्यक्तींना क्वारंटाईन केले जाते. मात्र, यावेळी कोरोना रुग्णांच्या घरातील जनावरांचे काय? त्यांना कुठे ठेवायचे, त्यांच्या अन्न-पाण्याचे काय? असा प्रश्न निर्माण होता

Animal lovers from Sangli are taking care of the pets of corona infected citizens
सांगली येथील प्राणीमित्र करत आहेत कोरोनाबधित नागरिकांच्या पाळीव प्राण्यांचा सांभाळ

By

Published : Jul 8, 2020, 8:41 PM IST

सांगली - कोरोनाबाधित झाल्यानंतर संबंधित कुटुंबातील पाळीव प्राण्यांचा सांभाळ कसा करायचा? हा प्रश्न एका प्राणी मित्राने सोडवला आहे. गेल्या महिन्याभरात कोरोनाबधितांच्या घरातील 12 पाळीव प्राण्यांना आपल्या घरी आणून त्यांचे पालनपोषण करत आहे. प्राणीमित्र अशोक लकडे आणि त्यांची संपूर्ण टीम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन हे काम करत आहेत.

एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला की, त्याला रुग्णालयात आणि त्याच्या घरातील व्यक्तींना क्वारंटाईन केले जाते. मात्र, यावेळी कोरोना रुग्णांच्या घरातील जनावरांचे काय? त्यांना कुठे ठेवायचे, त्यांच्या अन्न-पाण्याचे काय? असा प्रश्न निर्माण होता. मात्र, अशा कोरोनाबाधित रुग्णांच्या पाळीव प्राण्यांच्यासाठी सांगलीच्या मिरज येथील प्राणीमित्र अशोक लकडे आणि त्यांची टीम धावून आली आहे.

सांगली येथील प्राणीमित्र करत आहेत कोरोनाबधित नागरिकांच्या पाळीव प्राण्यांचा सांभाळ

हेही वाचा -वऱ्हाड्याचा झटका; वर्ध्यात लग्नानंतर 7 दिवसानी चक्क नवरदेवच निघाला कोरोनाबाधित...

ज्या व्यक्तीला कोरोना लागण झाली आहे किंवा संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले आहे. अशा व्यक्तींच्या घरातील पाळीव प्राण्यांची जबाबदारी अशोक लकडे घेत आहेत. एरवी ज्या व्यक्तीच्या घरात प्राण्यांचा सांभाळ करणे मुश्किल होते. किंवा रस्त्यावर अत्याचारग्रस्त प्राणी असतात त्यांच्यासाठी लकडे नेहमीच धावून जातात. आता या कोरोनाच्या आपत्तीमध्ये देखील अशोक लकडे कोरोनाग्रस्तांच्या घरातील पाळीव प्राण्यांच्या संगोपनासाठी पुढे आले आहेत.

त्यांनी मागील महिन्याभरापासून सांगली जिल्हा आणि किंवा कर्नाटक-बेळगाव या ठिकाणी ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. कोरोना रुग्णाच्या घरात जाऊन तेथून त्या पाळीव प्राण्यांना घेऊन ते आपल्या घरी आणून त्यांचे संगोपन करत आहेत. कोरोना व्यक्तीपासून त्या प्राण्यालाही कोरोनाची लागण होऊ शकतो असा प्रश्न असताना, लकडे मात्र प्राण्यांच्या जीव कसा वाचवायचा ? हा विचार करत असतात. हे सर्व करताना ते स्वतःचीही काळजी घेतात. त्या प्राण्यांना घेऊन येताना त्यांचे संगोपन करताना पीपीई किटचा वापर करतात.

हेही वाचा -व्हिडिओ : 'राजगृह' म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचा अमुल्य ठेवा

आतापर्यंत त्यांनी मिरज, सांगली आणि आसपासच्या गावातून त्याचबरोबर कर्नाटकच्या बेळगाव येथून जवळपास १२ प्राण्यांना आपल्या घरातल्या प्राणिसंग्रहालयात जागा दिली आहे. कोरोनाबाधित व्यक्तींच्या घरातील हे १२ जनावर आता त्यांच्या देखभाली खाली आहेत. त्यामध्ये ४ मांजरे आणि ८ पाळीव कुत्र्यांचा समावेश आहे.

प्राणिमित्र अशोक लकडे यांना सांगली पालिका प्रशासनाकडून योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पीपीई कीट असो किंवा इतर गोष्टी लकडे आणि त्यांच्या टीमला सांगली महापालिका प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांच्या घरातील पाळीव प्राण्यांचे हाल आता थांबले आहेत. तसेच कोरोनाबाधित व्यक्तींच्या घरातील हे पाळीव प्राणी लकडे यांच्या घरात आनंदाने राहत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details