अमित शाह यांची आज सांगलीच्या जतमध्ये पार पडणार सभा - bjp news
केंद्रीय गृहमंत्री आमित शाह यांची सांगली जिल्ह्यातील जतमध्ये सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
सांगली -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सांगलीच्या जतमध्ये सभा होणार आहे. भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा भाजपकडून सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ फुलवणाऱ्या जत मतदारसंघात पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकीतील अमित शहांची ही पहिलीच सभा भाजपच्या बालेकिल्ल्यात पार पडत आहे. या मतदारसंघात भाजपचे बंडखोर डॉ. रवींद्र आरळी यांनी मोठं आहवान उभे केले आहे. त्यामुळे भाजप अडचणीत आहे. त्या पार्श्वभूमीवर सभा पार पडत असून या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून लागले आहे.