सांगली -भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची आज सांगलीच्या तासगावमध्ये निवडणूक प्रचार सभा होणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ शाह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले असून तासगाव शहरातील जीवन विकास संस्थेच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात ही सभा पार पडणार आहे.
सांगली : अमित शाह यांची आज तासगावमध्ये प्रचार सभा - तासगाव
या सभेसाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासभेसाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
![सांगली : अमित शाह यांची आज तासगावमध्ये प्रचार सभा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3025734-thumbnail-3x2-shah.jpg)
अमित शाह
अमित शाह यांच्या सभेसाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या सभेसाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासभेसाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ११.३० वाजता अमित शाह हे बेळगाव मधून हेलिकॉप्टरमधून तासगावमध्ये दाखल होणार असून या ठिकाणी सभेला संबोधित करणार आहेत. यासभेसाठी भाजपचे अनेक मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.