सांगली - सोनिया- मनमोहन सरकारमध्ये कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार झाले आहेत, मात्र आमच्या सरकारवर एक रुपयांचेसुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही.असे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केला. ते सांगलीतील तासगाव येथे संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
आमच्या सरकारवर एक रुपयांचा सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप नाही - अमित शहा - gandhi
पिढयान पिढ्या एका परिवाराकडे देशाची सत्ता होती. याच कुटुंबानी देशावर राज्य केले आहे. इतक्या वर्षात त्यांनी काय केले, ते सांगावे.
सांगलीत मोदींची सभा
निवडणुका आल्या की राहुल गांधी आणि शरद पवारांना यांनी गरिबांची आठवण येते. पिढयान पिढ्या एका परिवाराकडे देशाची सत्ता होती. याच कुटुंबानी देशावर राज्य केले आहे. इतक्या वर्षात त्यांनी काय केले, ते सांगावे. मोदी सरकारने पाच वर्षात गरिबांना गॅस, वीज कनेक्शन, घरे, आरोग्याची योजना दिले आहे.
महाराष्ट्राचा विकास १५ वर्षात झाला नाही, मात्र मागील ५ वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून दिले आहे.