महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीच्या बहिणींना औरंगाबादच्या भावांकडून अनोखी ओवाळणी - distributed Useful Essentials Material

अॅम्बुलन्स हेल्प रायडरच्या सदस्यांनी रक्षाबंधनाचा सण सांगलीच्या पूरग्रस्त भागात तिथल्या बहिणींसोबत साजरा केला. त्यावेळी पुरामुळे अनेक बहिणींचे संसारे उद्धवस्त झाल्याच दिसलं त्यावेळी जमेल तितक्या बहिणींचे संसार उभा करायचा निश्चय ग्रुपने केला. त्यानुसार मदतीच्या दुसऱ्या टप्प्यात 251 बहिणींना मदत पाठवण्यात येणार आहे.

सांगलीच्या बहिणींना औरंगाबादच्या भावांकडून अनोखी ओवाळणी

By

Published : Aug 21, 2019, 9:54 AM IST

औरंगाबाद -सांगलीच्या पूरग्रस्त बहिणींना मदतीसाठी औरंगाबादचे भाऊ धावून जाणार आहेत. शहरातील 'अॅम्बुलन्स हेल्प रायडर ग्रुप' तब्बल 251 बहिणींचा संसार उभा करण्यास मदत करणार आहे. दोन ताट, वाट्या, चमचे यांच्यासह संसार उपयोगी वस्तू या ग्रुपतर्फे देण्यात येणार आहे.

सांगलीच्या बहिणींना औरंगाबादच्या भावांकडून अनोखी ओवाळणी

अॅम्बुलन्स हेल्प रायडरच्या सदस्यांनी रक्षाबंधनाचा सण सांगलीच्या पूरग्रस्त भागातील बहिणींसोबत साजरा केला. त्यावेळी पुरामुळे अनेक बहिणींचे संसारे उद्धवस्त झाल्याचे दिसलं. त्यावेळी जमेल तितक्या बहिणींचे संसार उभा करायचा निश्चय ग्रुपने केला. त्यानुसार मदतीच्या दुसऱ्या टप्प्यात 251 बहिणींना मदत पाठवण्यात येणार आहे.

सांगली - कोल्हापूर भागात आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. औरंगाबादची अॅम्बुलन्स हेल्प रायडर जिल्ह्यात अपघातग्रस्त लोकांना मदतीचे काम करते. सांगलीच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी हा ग्रुप गेला होता. रक्षा बंधनाचा पवित्र सण पूरग्रस्त महिलांसोबत साजरा केला. तिथल्या नागरिकांना मदत करत असताना तिथे येणाऱ्या अडचणी सदस्यांनी जाणून घेतल्या. त्यानुसार संसार उपयोगी वस्तू देण्याचा निर्णय ग्रुपच्या सदस्यांनी घेतला. त्यानुसार मित्रपरिवाराने दोन ताट, वाट्या, पातेले, चमचे देण्याचा निर्णय केला त्यानुसार मदत संकलित केली. इतकंच नाही काही दात्यांनी गृहउपयोगी किराणा सामान संकलित करून दिल. तर काही दात्यांनी कपड्यांची मदत केली.

मिळालेल्या मदतीची एक किट तयार करण्यात आली आहे, 251 किट तयार करण्यात आले असून ही सर्व मदत सांगलीला पाठवण्यात आली असून. दोन आठवड्यानंतर अजून मदत पाठवण्यात येणार असल्याचं हेल्प रायडरच्या सदस्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details