महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NRC व CAB विरोधात मिरजेत निघाला लक्षवेधी सर्वधर्मीय मोर्चा

एनआरसी आणि कॅब विरोधात मिरजेत आज भव्य सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला. या वेळी 'एनआरसी व सीएबी' विधेयक केंद्र सरकारने तातडीने रद्द करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली

all-religions-front-went-against-the-nrc-and-the-cab
NRC व CAB विरोधात मिरजेत निघाला लक्षवेधी सर्वधर्मीय मोर्चा

By

Published : Dec 20, 2019, 5:40 PM IST

सांगली - एनआरसी आणि कॅब विरोधात मिरजेत आज भव्य असा सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा मध्ये मिरजेतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संविधाना विरोधी असणारे 'एनआरसी व सीएबी' विधेयक केंद्र सरकारने तातडीने रद्द करावे, अशी जोरदार मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.

हेही वाचा -मोबाईल चोर टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक विरोधात देशभर संतप्त पडसाद उमटत आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात 'एनआरसी व सीएबी' विधेयका विरोधात सर्व धार्मिय मोर्चा काढण्यात आला. मुस्लीम समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या, या मोर्चात अनेक राजकीय पक्ष व इतर धार्मिय नेत्यांनी सहभाग घेतला होता. हजारोंच्या संख्येने निघालेल्या या मोर्चात मुस्लिम बांधवांची संख्या ही लक्षणीय होती. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या ख्वाजा मीरासाहेब दरग्या पासून प्रांत कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध पणे हा मोर्चा निघाला. एनआरसी व कॅब विधेयक रद्द करा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणांनी यावेळी शहर दुमदुमून निघाले.

हेही वाचा -..तर गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा; रघुनाथ पाटलांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details