सांगली - पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे. नुकसान भरपाई, वाढीव मदत याचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी 31 ऑगस्टला सांगलीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. ऊस आंदोलनापेक्षा तीव्र आंदोलन पूरग्रस्तांसाठी करणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत जाहीर केले.
पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानीसह सर्वपक्षीयांचा ३१ ऑगस्टला मोर्चा - राजू शेट्टी - स्वाभिमानीसह सर्वपक्षीयांचा ३१ ऑगस्टला मोर्चा
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील महापुराला केंद्र सरकारचा नाकर्तेपणा आणि दोन्ही राज्य सरकारचा असमन्वय जबाबदार आहे. सांगलीतील पूरस्थितीला पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी जबाबदार असून दोघांवर कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टींनी केली.
राजू शेट्टी
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील महापुराला केंद्र सरकारचा नाकर्तेपणा आणि महाराष्ट्र- कर्नाटक सरकारचा असमन्वयपणा जबाबदार आहे. तसेच सांगलीतील पूरस्थितीला पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी जबाबदार असून दोघांवर कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टींनी केली. महापुरावर नियंत्रण ठेवायाचे असल्यास दोन्ही राज्यातील धरणांच्या विसर्गासाठी केंद्रीय जल आयोगाच्या माध्यमातून नियमन होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.