सांगली- हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टर तरूणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा सांगलीत निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने कँडल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या हत्याकांडातील नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
हैदराबादमधील बलात्कार प्रकरणाचा सांगलीतही निषेध; नराधमांना फाशीची मागणी - बलात्कार प्रकरणाचा सांगलीत निषेध
हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. याचे पडसाद देशभर उमटत असून या अमानवी कृत्याचा निषेध करण्यात येत आहे. सांगलीतही सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने या घटनेचा निषेध करत या हत्याकांडातील नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे संतप्त पडसाद देशभर उमटत आहेत. सांगलीतही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. शहरातील स्टेशन चौकातून सांगलीकर जनतेने कँडल मार्च काढत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर या तरूणीला श्रद्धांजली वाहिली. तसेच नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी महिला आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.