महाराष्ट्र

maharashtra

भूखंड आरक्षण रद्द वरून वातावरण तापले, सर्वपक्षीय कृती समिती आणि भाजपा-राष्ट्रवादीचे परस्पर विरोधी आंदोलन..

भूखंड आरक्षण रद्द करण्यावरून सांगलीत वातावरण तापले आहे. या भूखंड आरक्षणा विरोधात सर्वपक्षीय कृती समिती आणि भाजपा-राष्ट्रवादीने आंदोलने केली.

By

Published : Dec 15, 2020, 4:09 PM IST

Published : Dec 15, 2020, 4:09 PM IST

All-Party Action Committee and BJP-NCP conflicting agitation over cancellation of land reservation
भूखंड आरक्षण रद्द वरून वातावरण तापले, सर्वपक्षीय कृती समिती आणि भाजपा-राष्ट्रवादीचे परस्पर विरोधी आंदोलन..

सांगली - सांगली महापालिकेच्या आरक्षित असलेल्या भूखंडावरील आरक्षण रद्दच्या मुद्द्यावरून सांगलीमध्ये परस्पर विरोधी आंदोलने करण्यात आली आहेत. सर्व पक्षीय कृती समितीकडून आरक्षण रद्द विरोधात, तर भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

भुखंड आरक्षण रद्द विरोधात आंदोलन -

सांगली महापालिकेच्या आरक्षित असणाऱ्या भूखंड विक्रीच्या मुद्द्यावरून महापालिका क्षेत्रातील वातावरण तापले आहे. सांगलीतील दोन आरक्षित भूखंड आजी-माजी नगरसेवकांच्याकडून आरक्षित भूखंडावरील आरक्षण उठवून विक्री करण्याचा घाट घालण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप करत सर्व पक्षीय कृती समितीने लढा सुरू केला आहे.

भूखंड आरक्षण रद्द वरून वातावरण तापले, सर्वपक्षीय कृती समिती आणि भाजपा-राष्ट्रवादीचे परस्पर विरोधी आंदोलन..

आरक्षण रद्द करू नये -

या मागणीसाठी सर्व पक्षीय कृती समितीकडून सांगली महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वेळी अनेक सामाजिक संघटना, जी-माजी नगरसेवकांनी आंदोलनात सहभाग घेतला. पालिकेच्या 600 हुन अधिक भूखंड आहेत. ज्यावर क्रीडांगण, उद्यान, आरोग्य केंद्र, शाळा अशी आरक्षण आहेत. मात्र, यातील बऱ्या पैकी भूखंड हे पालिकेच्या नावावर नाहीत. त्यामुळे या भूखंडावरील आरक्षण उठवून त्या जागा विक्री करण्याचे डाव सुरू असल्याचा आरोप सर्वपक्षीय कृती समितीकडून करण्यात आला आहे.

कोणत्याही स्थितीत आरक्षण रद्द होऊ देणार नाही -

सर्वपक्षीय नेते व माजी नगरसेवक गौतम पवार म्हणाले, सत्ताधारी भाजपा आणि पालिका प्रशासनाकडून पालिकेचे एका भुखंडवर आरक्षण असताना त्याठिकाणी नागरी वस्ती असल्याचा बनाव करून भूखंड वरील आरक्षण उठवण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. येत्या 17 डिसेंम्बरला होणाऱ्या महासभेच्या विषयपत्रिकेवर हा प्रस्ताव ठेवून आरक्षण उठवण्याचा ठराव पास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आम्ही तो कदापि होऊ देणार नाही. प्रसंगी रस्त्यावरची लढाई तीव्र करू आणि सत्ताधारी असो किंवा जे या मध्ये सामील असतील त्यांना पालिकेची पायरी चढू देणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

आरक्षण रद्दसाठी सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादीचे आंदोलन -

सर्व पक्षीय कृती समितीचे आंदोलन सुरू असताना सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय कृती समितीच्या मागण्यांच्या विरोधी आंदोलन करण्यात आले आहे. भाजपा नगरसेवक राजेंद्र कुंभार, नगरसेविका कल्पना कोळेकर, सोनाली सगरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक विष्णू माने यांच्या प्रभाग क्रमांक 8 मधील जिजामाता सह गृह-निर्माण संस्था आहे. याठिकाणी असणाऱ्या जागेवर प्राथमिक शाळा आणि क्रीडांगण आरक्षण पडले होते. मात्र, गेल्या 38 वर्षांपासून शेकडो नागरिक राहत आहेत, त्यामुळे येथील आरक्षण रद्द करण्याची मागणी घेऊन नागरीकांनी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली.

अन्यथा स्थानिक नागरिक उपोषण करतील-

यावेळी भाजपाचे युवा नेते विशाल मोरे म्हणाले, वारणाली येथील विद्यानगर या ठिकाणी जिजामाता सह गृह-निर्माण संस्थेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात घरे विकसित झाली आहेत. पालिकेच्या स्थापने आधी याठिकाणी ही घरे झाली आहेत. मात्र त्या जगावर पालिकेचे आरक्षण पडले आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे आरक्षण रद्द करण्यासाठी स्थानिक रहिवाशी प्रयत्न करत आहेत. मात्र, सर्वपक्षीय कृती समिती आरक्षण रद्द करण्याचा प्रस्तावाला विरोध करत आहे. सामान्य जनेतचा विचार करुन पालिकेने आरक्षण रद्द करावे, अन्यथा यापुढील काळात नागरीक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा मोरे यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details