सांगली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा मार्क्सवादी पार्टी व अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने सांगलीत निषेध नोंदवण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या विरोधात जोरदार निदर्शने करत 'ट्रम्प चले जाव'च्या घोषणा देण्यात आल्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने भारत सरकार आमेरिकेच्या दबावापोटी दूध बाजार, चिकनसाठी देशातील बाजारपेठ खुला करणार आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या फळांसाठी १०० टक्के असलेला आयातकर १० टक्के करणार आहेत. यामुळे भारतीय शेतकरी व संबंधीत मजुर यांच्यावर संकंट येऊन आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होणार आहे. म्हणून अशा प्रकारचे कोणतेही करार आमेरिकेबरोबर करु नये. या मागणीसाठी शहरातील स्टेशन चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकार आणि ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.