सांगली- राज्य सरकारने रेड झोनमधल्या मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना लॉकडाऊनमध्ये अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे सांगलीमध्ये सकाळपासून तळीरामांनी आज दुकाने उघडतील या आशेने वाईन शॉपसमोर गर्दी केली होती. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारुची दुकाने उघडण्याचे आदेश प्राप्त झाले नसल्याने सांगलीतील दुकाने उघडली गेली नाहीत. त्यामुळे त्यामुळे हिरमोड झालेल्या तळीरामांना रिकाम्या हातानेच घरी परतावे लागले.
दारू दुकानांसमोर तळीरामांची गर्दी, पण रिकाम्या हातानेच परतले घरी - Corona virus
सांगली शहराचा ऑरेंज झोनमध्ये समावेश असल्यामुळे सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तसेच दारूची दुकानेही सुरू होणार असल्याने सकाळपासून दारूच्या दुकानासमोर मद्यपींनी गर्दी केली होते. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणताही आदेश मिळाला नसल्यामुळे दुकान मालकांनी दारू दुकाने उघडली नाहीत.
![दारू दुकानांसमोर तळीरामांची गर्दी, पण रिकाम्या हातानेच परतले घरी Sangali](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7054892-100-7054892-1588583010162.jpg)
सांगली शहराचा ऑरेंज झोनमध्ये समावेश असल्यामुळे सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तसेच दारूची दुकानेही सुरू होणार असल्याने सकाळपासून दारूच्या दुकानासमोर मद्यपींनी गर्दी केली होते. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणताही आदेश मिळाला नसल्यामुळे दुकान मालकांनी दारू दुकाने उघडली नाहीत. परिणामी तळीरामांना पदरी परत एकदा निराशच आली.
रेड झोन मध्ये गेलेली सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे ऑरेंज झोन मध्ये गेली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून शहरात लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. सोमवारपासून अनेक दुकान व्यवसाय आणि नागरिकांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या बरोबर इतर दुकानेही उघडण्याची परवानगी काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे.