सांगली - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली शहरातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शहरातील स्टेशन चौक या ठिकाणी शहरातल्या पूर परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. दरम्यान, महापालिका आयुक्त कापडणीस यांच्याकडून महापालिका क्षेत्रातल्या पुर परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी मदत व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
सांगलितील पूर परिस्थितीची अजित पवारांनी केली पाहणी, राज्य सरकार पुरग्रस्तांच्या पाठीशी असल्याची दिली ग्वाही - Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली शहरातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शहरातील स्टेशन चौक या ठिकाणी शहरातल्या पूर परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला.
सांगलितील पूर परिस्थितीची अजित पवारांनी केली पाहणी
'राज्य सरकार पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी'
या आढाव्यानंतर अजित पवार यांनी शहरातल्या दामाणी हायस्कूला भट दिली. यामध्ये मदनभाऊ पाटील युवा मंच यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या निवारा केंद्र या ठिकाणी भेट देत, पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, राज्य सरकार पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभे असल्याची येथील नागिरकांना ग्वाही दिली.