सांगली - केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याची टीका कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्राची परिस्थिती पाहता माणुसकीच्या नात्याने केंद्राने पाहावे, अशी विनंतीदेखील कदम यांनी केली आहे.
माणुसकी म्हणून तरी मदत करावी...
सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका प्रशासनाचे आज कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला आयुक्त,महापौर यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील ऑक्सिजन, रेमडेसिवीरची परिस्थिती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळणे आवश्यक आहे. मात्र, महाराष्ट्राची परिस्थिती पाहता केंद्राकडून दुजाभाव करण्यात येत असल्याची आरोप कदम यांनी केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने माणुसकीच्या भावनेने पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
केंद्राने महाराष्ट्राला माणुसकी म्हणून मदत करावी - विश्वजित कदम - विश्वजित कदमांची केंद्र सरकारवर टीका
राज्यातील ऑक्सिजन, रेमडेसिवीरची परिस्थिती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळणे आवश्यक आहे. मात्र, महाराष्ट्राची परिस्थिती पाहता केंद्राकडून दुजाभाव करण्यात येत असल्याची आरोप कदम यांनी केला आहे.
केंद्राने महाराष्ट्राच्या मागणीनुसार मदत केली पाहिजे
राज्य सरकार सर्व पातळ्यांवर ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे विश्वास कदम यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर लसीकरणाच्या बाबतीत सिरम कंपनीसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे आणि लवकरच एकाच दरात लसी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय होईल असेही स्पष्ट केले. पुणे आणि सांगली येथे भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून लवकरच ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असल्याचेही विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे.