महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऐतवडे बुद्रुक येथे कृषी विभागाकडून घरीच बियाणे उगवणक्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक - agri department gave practical of seed germination test at aitwade

कृषी सहाय्यक पाटील यांनी शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरण्यासाठी उगवण क्षमता तपासणी करण्याचे आवाहन केले. सोयाबीनची पेरणी करताना घरचे बियाणे वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

agri-department-gave-practical-of-seed-germination-test-at-aitwade
ऐतवडे बुद्रुक येथे कृषी विभागाकडून घरीच बियाणे उगवणक्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक सादर

By

Published : May 6, 2020, 1:19 PM IST

वाळवा(सांगली)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बी बियाणांची कमतरता भासणार असल्याने कृषी विभागामार्फत वाळवा तालुक्यातील गावामध्ये कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यकांमार्फत घरच्या घरी बियाणे उगवण क्षमता तपासणी मोहीम राबविली जात आहे.

ऐतवडे बुद्रुक येथे कृषी विभागाकडून घरीच बियाणे उगवणक्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक सादर

वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे प्रगतशील शेतकरी शहाजी गायकवाड यांचे घरी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.या प्रात्यक्षिकामुळे घरातील बियाणी पेरणी योग्य आहे का त्याची उगवण क्षमता किती आहे हे समजून सोयाबीन उत्पादन वाढीस मदत होणार आहे.

कृषी सहाय्यक श्रीकांत पाटील यांनी प्रात्यक्षिक करून दाखवत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रत्यक्षिकाावेळी शेतकरी सर्जेराव गायकवाड, विजय जंगम, पोलीस पाटील संतोषदेव इंग्रळकर, किशोर कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी कृषी सहाय्यक पाटील यांनी शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता तपासणी करण्याचे आवाहन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details