सांगली- शेतकऱ्यांना प्रामुख्याने भेडसावणारा प्रश्न म्हणजे पिकाला लागलेली हुमणी कीड हा आहे. खरीप हंगाम व पावसाळा लवकरच सुरू होत असल्याने हुमणी किडीचा प्रादूभाव वाढणार आहे. यामुळे हुमणी किडीला अंडी घालण्यापासून थांबवण्यासाठी कृषी विभागाने हुकमी ट्रॅप शोधून काढला आहे. शेतातील भुंगे व किडीला एकत्र पकडून मारण्यासाठी वाळवा तालुका कृषी विभागाने लाईट ट्रॅप व एरंडेल ट्रॅपचा वापर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.
अनोखा प्रयोग; कृषी विभागाचा लाईट ट्रॅप, एरंडेल ट्रॅप हुमणी किडीवर प्रभावी - कृषी विभाग सांगली
मागील अनेक वर्षांपासून शेतकरी हुमणी किडीमुळे त्रस्त आहे. महागडी औषध फवारण्या व लागवडी घालून पिकवलेले ऊस पीक हुमणीमुळे एका क्षणात वाया जात आहे. यामुळे हुमणी किडीला अंडी घालण्यापासून थांबवण्यासाठी कृषी विभागाने हुकमी ट्रप शोधून काढला आहे.
सांगली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे वाहतूक व मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच कुजून गेला. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिकावर नांगर फिरवला. आता शेतकरी बांधव पुन्हा आपल्या शेतात पीक घेण्यासाठी तयारीला लागला आहे. पण मागील अनेक वर्षांपासून शेतकरी हुमणी किडीमुळे त्रस्त आहे. महागडी औषध फवारण्या व लागवडी घालून पिकवलेले ऊस पीक हुमणीमुळे एका क्षणात वाया जात आहे. याचा विचार करून वाळवा तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतात दोन तीन फूट लांबीचा खड्डा पाडायचा. त्यात पिवळ्या रंगाचा प्लास्टिक कागद अंथरून त्यात पाणी ओतून त्यावर लाईटचा बल्ब लावायचा. रात्रीच्या वेळेस जे भुंगे व किडे बाहेर पाडतात, ते या लाईटच्या उजेडाने त्या पाण्यात पाडतात व मरून जातात. यामुळे भुंग्यापासून जन्माला येणारी हुमणीच्या प्रजनन जाती थांबल्या जातात.
ज्या शेतकऱ्यांना लाईटची सोय नाही, अशा शेताच्या कडेला एक तेलाचा मोकळा डबा अर्धा पुरुन त्यात चार लिटर पाणी घालून 250 ग्राम एरंडेल बियाची बुकटी, थोडे ताक व थोडे बेसन पीठ टाकून तीन दिवस ठेवावे. या मुळे शेतातील किडे व भुंगे या पाण्याच्या वासाने आकर्षित होऊन पाण्यात मरून पाडतात. यामुळे ही हुमणी जन्माला येऊ शकत नाहीत. यामुळे लाईट ट्रॅप व एरंडेल ट्रॅप शेतकऱ्यांना एक प्रकारे वरदान ठरणार आहे. वाळवा तालुक्यात आतापर्यंत कुरळप ऐतवडे बुद्रुक गावासह परिसरात 473 लाईट ट्रॅप व एरंडेल ट्रॅप बनवले आहेत. यासाठी लागणारे साहित्य वाळवा कृषी विभाग इस्लामपूर यांच्याकडून मोफत दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना हुमणीसाठी महागडी औषध खरेदी करण्याची गरज भासणार नाही. यातून शेतकऱ्यांची पैशाची बचत होणार आहे.